पंढरपूर प्रतिनिधी
फेब्रुवारी महिना जसजसा संपत आहे तसतसा उन्हाळा ऋतू जवळ आल्याचे जाणवत आहे आणि त्याचबरोबर उन्हाळ्याची तीव्रताही वाढत असल्याचे जाणवत आहे. जिल्हा परिषद शाळा, खर्डी व खर्डीशी संलग्न गावांतील नऊ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वेणुनगर, गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे यांच्या तर्फे गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या उपस्थितीत व खर्डी ग्रामस्थांच्या हस्ते थंड पाण्याचे जार वाटप करण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील खताळ वस्ती, घाडगे वस्ती, रणदिवे वस्ती, चव्हाण वस्ती, जाधव-पाटसकर वस्ती, पाटील वस्ती, मुसलमान वस्ती, काळा खोरा आणि खर्डी या सर्व जिल्हा परिषद शाळांना थंड पाण्यासाठी चांगल्या प्रतीचे जार वाटप करण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख दत्तात्रय येडगे, केंद्रीय मुख्याध्यापक मच्छिंद्र जगदाळे, मुख्याध्यापक वाघमोडे गुरुजी, लक्ष्मण भुसे, निळकंठ गोरे, प्रकाश राऊत, गौरीहर उखळे, राजेंद्र भोसले, पिंटू खुळे, शिक्षक दादासाहेब खांडेकर, बालाजी शिंदे, लिगाडे मॅडम, मिलिंद परिचारक, अवधूत मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान रोंगे, अर्जुन रोंगे, बापूसो रोंगे, गवळी सर, विकास रोंगे, मोहन रोंगे, शरद रोंगे, पोपटकाका पाटील, अतुल रोंगे, पांडुरंग रोंगे, ग्रा.पं.सदस्य मुलाणी, शाळा व्यवस्थापन सदस्या स्वप्नाली रोंगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐन उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी पाण्याचे जार मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापना मध्ये व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.