मायणी प्रतिनिधी
इंदिरानगर परिसरामध्ये पाईपलाईन लिकीजमुळे दूषित पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात होत होता व इथेच डेंगू चे प्रमाण हे नागरिकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आढळे होते दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष फिरोज भाई मुलांणी यांनी आवाज उठवल्यानंतर तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य युवराज भिसे यांनी नागरिकांना भेटी घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाईपलाईनचे लिकेज काढून दूषित पाणी थांबवले तसेच गावातून येणारा केरकचरा इंदिरानगर परिसरात जवळ विस्कटला जातो त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लवली जाईल असा शब्द नागरिकांना दिला
मायणी शिवसेना अध्यक्ष फिरोज मुलाणी यानी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य युवराज भिसे यांचे आभार मानले व नागरिकांची कामे व अडचणी विभागातील ग्रामपंचायत सदस्य करतात स्वयंघोषित कोणीही बाहेरचे करत नाहीत अडचणी सदस्य युवराज भिसे यांना सांगा नाही झाल्यास मायणी विभागातील नागरिकांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरून उरेल शेवटच्या श्वासापर्यंत लढेल अडचणीसाठी शिवसेनेची संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन केले