पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेची प्राचार्य राजेंद्र पाराध्ये हे होते. मुख्य लिपिक हनुमंत मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आपल्या भाषणातून काही प्रसंग सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे व प्रा.तुकाराम मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज विषयी उद्बोधक विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाई मुलाणी यांनी केले. सविता उपलप यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे,पर्यवेक्षक सुनील पाटील,अशोक पवार, सोमनाथ फडतरे, बाबासाहेब शिरसट,मगन सुळे, शांतिनाथ गुरव, श्रीकांत चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.