तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला .याप्रसंगी महानशास्त्रज्ञ,, भारतरत्न ,नोबेल पुरस्कार विजेते चंद्रशेखर रमण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी केले. यावेळी व्यासपीठावरती विज्ञान अध्यापक एस .डी खोब्रागडे, पी. एस. प्रतीहार, वी .एस. राऊत, इदू मॅडम होत्या.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. या राष्ट्रीय विज्ञान सप्ताहात २२ ते २८ फेब्रुवारी २३ या सप्ताहात शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती अर्थात ग्रॅव्हिटीच्या संदर्भात चित्रपट, चंद्र व ग्रह यांचे टेलिस्कोप द्वारा दर्शन ,विज्ञानावर आधारित वेगळे प्रयोग, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र , उपकरणे यांचे प्रदर्शन असे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन
या सप्ताहात करण्यात आले होते .
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य, गंगाराम सिंह यांनी रमण इफेक्ट म्हणजे काय? प्रकाशाचे विकिरण होणे म्हणजे काय? प्रकाश किरणांचे रेणू मधील भ्रमण ,पदार्थांच्या रंगांमधील बदल यांची तर्कशुद्ध माहिती देऊन विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन एच .जी. जाधव यांनी केले.