पंढरपूर प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांना पंढरपूर रोटरी क्लब व इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर यांच्या संयुक्त उपक्रमातून जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना टुथब्रश व टूथपेस्ट वाटत करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना डाॅ. संगीता पाटील यांनी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यामध्ये विशेषतः दातांची निगा कशी राखावी, दात स्वच्छ व चमकदार ठेवणेसाठी काय करावे याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूरचे अध्यक्ष डाॅ. अनुप फडे, डाॅ. भाग्यश्री वायकुले, डाॅ. तुषार खंडागळे, डाॅ. योगेश दोशी यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली.
यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून टुथब्रश व टूथपेस्ट वाटप करण्यात आली. यावेळेस ह.भ.प. जोगदंड महाराज, रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, सचिव सचिन भिंगे सह रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.