पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात ३१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत सिंहगड वार्षिक क्रिडा स्पर्धा २ के २३ उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, प्रा. शिवाजी पवार, प्रा. सुमित इंगोले प्रा.भालचंद्र गोडबोले आदींच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये क्रिकेट, इंडोर गेम्स, कॅरम टेबल, टेनिस चेस आणि आऊटडोअर मध्ये क्रिकेट, खो-खो हालीबाॅल, बास्केटबाॅल आदी खेळांचा समावेश करण्यात आला होता.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय विजयी स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले.
हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. शिवाजी पवार सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परीश्रम घेत आहे.