जूना प्रभाग क्रमांक ०८ येथे हात से हात जोडो अभियाना पूर्वतयारी बैठक संपन्न
सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जूना प्रभाग क्रमांक 08 मध्ये होणाऱ्या "हात से हात जोडो" अभियानाच्या पूर्वतयारीसाठी शहर काँग्रेसचे सरचिटणीस शकील मौलवी व युवा नेते सोहेल कुरेशी यांनी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक समाचार चौक बुज़ुर्गअली दर्गा हॉल शुक्रवार पेठ येथे आयोजित केली होती.
यावेळी इस्माईल कुरेशी व असद पठाण यांची वार्ड अध्यक्ष पदी निवड करून त्यांचे निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी बलिदान दिले त्यावेळी हे भाजपवाले किंवा त्यांची मातृसंस्था कुठेच नव्हती. समाजासमाजामध्ये भांडने लावून राजकीय फायदा मिळविनारे भाजपवाले आज ते आपल्याला राष्ट्रप्रेम शिकवत आहेत. काँग्रेसने या सत्तर वर्षात सर्वधर्माना बरोबर घेऊन या देशाचा विकास केला. देश एकत्र ठेवला सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या देशात भाजपने जातीधर्मात भांडने लावण्याचे काम केले म्हणून हा देश अखंड ठेवण्यासाठी राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली "भारत जोडो यात्रा" केली त्याचाच एक भाग म्हणून त्याचा संदेश, मोदी सरकारचे अपयशी क्रारभार, राज्यातील खोके सरकार, महापालिकेतील भाजपचा भोंगळ कारभार जनतेपर्यंत पोहोचविन्यासाठी "हात से हात जोडो अभियान" सुरु करणार आहोत.
यावेळी माजी महापौर आरिफ शेख, जेष्ठ नेते मकबूल मोहोळकर, रियाज बागवान, जुबेर कुरेशी, जाबीर अल्लोळी, रेवणसिद्ध आवजे, हसीब नदाफ, देवीदास गायकवाड़, केशव इंगळे, अंबादास बाबा करगुळे, शोहेब महागामी, प्रवीण वाले, राहुल वर्धा, दीनानाथ शेळके, इलियास शेख, विवेक कन्ना, तिरुपती परकीपंडला, सैफन शेख, बाबा जानी, नागनाथ कदम, मधुकर आठवले, पापाभाई कुरेशी, काय्युमभाई कुरेशी, हाजिसाब कुरेशी, शेखसाब, सलिमभाई, अब्बासचाचा, फारुख अंबलगी, इकबाल दुर्वेश, मुबीन सय्यद, परवेझ जमादार, सज्जू शाबाद, लतीफ शेख, सामी मौलवी, इरफान रामपुरे, ग़ैबु साहेब, लतीफ शब्दि, सुभाष वाघमारे, शशिकांत जाधव, नागनाथ शावने, संदीपान सोनवणे, वसिष्ठ सोनकांबळे, अरुणा वर्मा, सुनीता बेरा, मुमताज तांबोळी, मुमताज शेख, विकास येळेगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्तित होते.