सोलापूर प्रतिनिधी
दि. ११ ते १२ फेब्रुवारी दरम्यान सोलापूर येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर ड्रॉप रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी उद्या शनिवार दि. ४ रोजी सकाळी १२ वाजता सम्राट चौक येथील उमा बाई श्राविका विद्यालय सोलापूर येथे सब ज्युनिअर गटासाठी मुला -मुलींची निवड चाचणी ही सिंगल, डबल व मिक्स डबल व ट्रिपल या चार प्रकारामध्ये घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत फक्त १३ मुले व १३ मुलींची निवड करण्यात येणार आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी शहर जिल्हयातून जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावे असे आवाहन ड्रॉप रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोरे व सचिव विठ्ठल कुंभार यांनी केले आहे.
निवड चाचणीसाठी अजित पाटील-९८८१००९२५७ , सुहास छंचुरे -९०२८०७५१५१ यांच्याशी संपर्क साधावा.