सोलापूर प्रतिनिधी
श्री.बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था संचालित श्री. भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून एस व्ही.सी.एस शिक्षण संकुल भवानी पेठ चे प्राचार्य राजकुमार भोरे , शालेय समितीचे सदस्य शिवशरण बिराजदार ,प्राचार्य केदार माळी ,व पर्यवेक्षक रामेश्वर झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री.वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व श्री. तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महा स्वामीजी यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत, व बुके,लेखणी देऊन यथोचित सत्कार करण्यात आले. तदनंतर प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांनी प्रास्ताविकातून शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.नंतर अजय नवगिरे,कु. सोनिया नवगिरे,कु. शितल कलशेट्टी, कु सानिया मियावाले,कु.संजिता बिराजदार,अंबिका खांडेकर,कु.अंजली पांढरे,कु.अश्विनी लामतुरे इत्यादी विद्यार्थ्यांनी संस्था,शाळेविषयी व गुरुजनाबद्दल ऋण व्यक्त केले.
यावेळी रामेश्वर झाडे यानी मनोगत व्यक्त केले. तदनंतर प्रमुख पाहुणे एस व्ही सी एस भवानी पेठ शिक्षण संकुलाचे प्राचार्य राजकुमार भोरे यांनी, विद्यार्थ्यांनी वाचन,मनन,चिंतन करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन,बारावीच्या बोर्ड परीक्षेला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य केदार माळी यांनी आपल्या मनोगताद्वारे स्पर्धात्मक युगात चिकाटी व सातत्याच्या जोरावर यशस्वी होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.मल्लिनाथ हुलसुरे सर,प्रा. सचिन होटगे, व श्री. सिद्धाराम पुजारी,श्री.दत्ता ऐवळे कर्मचारी,तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कु.रोहिणी बिराजदार व कु. अंबिका खांडेकर तर आभार प्रा. दत्तात्रेय
बिराजदार सर यांनी मानले.