पंढरपूर प्रतिनिधी
केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे व मंदीर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदीर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.