मंगळवेढा प्रतिनिधी
दिनांक १५/०२/२०२३ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने साो, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चडचण (कर्नाटक राज्य) येथून एक अशोक लेलंड कंपनीची दोस्त वाहन मधून एक इसम हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक रणजीत माने साो, परि. पोसई धापटे सो, पोहेकॉ / महेश कोळी, पोकॉ/ मळसिध्द कोळी, पोकॉ/ अजित मिसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंगळवेढा विभाग मंगळवेढा येथील पोकॉ ११३३ / प्रशांत चव्हाण अशी टिम तात्काळ मौजे महमदाबाद ता. मंगळवेढा येथील ओढयातील कच्च्यारोड वरून अवैधरित्या गुटखा वाहतुक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने खाजगी वाहनाने रवाना झाले असता महमदाबाद ता. मंगळवेढा येथील ओढयातील कच्च्यारोडवर आलो असता १८. ४५ वा. चे सुमारास समोरून एक अशोक लेलंड कंपनीची दोस्त वाहन आले त्यावेळी आम्ही सदर वाहन थांबविले त्यावेळी सदर वाहनाचे आर.टी.ओ नंबर पाहता तो एम. एच ४५ ए. एफ. ३७७१ असा दिसून आला.
सदर वाहना मध्ये एक चालक होता. तेव्हा आम्ही त्याचे नांव, गांव विचारले असता त्याने त्याचे नांव १) बाजीराव विष्णु बाबर वय ३८ वर्षे रा. मु.पो आलेगांव ता. सांगोला जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यावेळी आम्ही सदर वाहनाच्या हौदयात काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर वाहनाच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले आहे. सदर गुटखा माल व वाहन हे कोणाचे मालकीचे आहे असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा २) दिलीप रामचंद्र मस्के रा. मस्के कॉलनी सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. सदरचा गुटखा हा कोठून आणला अथवा त्याचा पुरवठादार कोण आहे असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा ३) श्रीशैल उर्फ अप्पु कलमनी रा. चडचण ता. चडचण जि. विजापूर राज्य कर्नाटक याच्याकडून आणल्याचे सांगत आहे.
तरी सदर अशोक लेलंड कंपनीची दोस्त वाहन हे मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आणून सदर वाहनाच्या हौदयातील गुटखा तपासून पाहता त्यात खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे. १) ८,७३,६००/- त्यात विमल पान मासालाचे ७२८० पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत १२० रूपये प्रमाणे
२) २,१८,४००/- त्यात व्ही- १ तंबाखुचे ७२८० पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत ३० रूपये प्रमाणे.
३) २,४४,८००/- त्यात सुपर पान मसालाचे २०४० पाऊच प्रत्येक पाऊचचे किंमत १२० रूपये प्रमाणे.. ४) ३०,६००/- त्यातै नचमत ९९९ चे तंबाखुचे पाऊच प्रत्येक पाउचचे किंमत १५ रुपये प्रमाणे.
५) २,४९,६०० /- त्यात आर. एम. डी पान मसालाचे ३२० पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत ७८० रूपये प्रमाणे.
६) १,१५,२००/- त्यात एम सेंटेंट तंबाखुचे ३२० पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत ३६० रूपये प्रमाणे.
७) ९,००,०००/- त्यात एक चारचाकी अशोक लेलंड कंपनीची दोस्त वाहन त्याचा आर.टी.ओ नंबर एम. एच ४५ ए. एफ. ३७७१ असा असलेला जुवाकिअं.२६,३२,२०० /- असा एकूण वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे.
त्यानंतर पोलीस ठाणेस आणून मा. सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना सदर वाहनातील गुटखा जन्यपदार्थ व इसम यावर योग्य ती कायदेशीर कारवाईक करणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांनतर मा. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापूर यांच्या पथकाने मंगळवेढा पोलीस ठाणेस येवून सदरचा मुददेमाल व इसम यांना त्याचे ताब्यात दिले.
येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा गुटखाजन्य माल व वाहन, आरोपी मिळून आल्याने सदरचा मुददेमला पंचनामा करून मा. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापूर यांनी सदर मुददेमालाचा पंचनामा करून सदर इसम नामे १) बाजीराव विष्णु बाबर वय ३८ वर्षे रा. मु.पो आलेगांव ता. सांगोला जि. सोलापूर, २) दिलीप रामचंद्र मस्के रा. मस्के कॉलनी सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर, ३) श्रीशैल उर्फ अप्पु कलमनी रा. चडचण ता. चडचण जि. विजापूर राज्य कर्नाटक यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाणेस भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i) व २६ (२) (ii) २६ (२) (iv), सहवाचन कलम २७ (३) (E), कलम ३० (२) (A) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / ९०५ महेश कोळी हे करीत आहेत.
सदर कारवाई करीता पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम मंगळवेढा विभाग मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, यांनी व त्याचे पथकातील परि. पोसई धापटे , पोहेकॉ / महेश कोळी, पोकॉ/ मळसिध्द कोळी, पोकॉ / अजित मिसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंगळवेढा विभाग मंगळवेढा येथील पोकॉ ११३३ / प्रशांत चव्हाण यांचेसह कारवाई केली आहे.