भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत च्या वतीने पंधरावा वित्त आयोगातून पाटील वस्ती येथील पाणीपुरवठ्याच्या कामाचे उद्घाटन बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कसबा भाळवणी येथील काशीबाई विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भगवानराव चौगुले, हरिभाऊ शिंदे, दीपक गवळी, विठ्ठल चौगुले, अर्जुन लिंगे रणजीत जाधव, नितीन शिंदे, पोपट इंगोले, भिमराव जाधव सर,ग्रामविकास अधिकारी वाघमारे, दामोदर देशपांडे,नागेश पाटील, अशोक पाटील, विलास पाटील,बाळू खनपटे,सिताराम मोरे, राजू बाबर ,विकास गाजरे, जयराम गायकवाड, समाधान मोरे ,आर के पवार आदि उपस्थित होते.