पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूलमध्ये KARGIL 2K22 क्रीडा दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे फाउंडर प्रेसिडेंट आणि खजिनदार दादासाहेब रोंगे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मशाल पूजनाने झाली.
यावेळी स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लोटस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी श्रावणी वाडदेकर,ऋतू पर्णा विजागत,राजा साळुंखे, प्रेरणा विजागत,यांनी स्वागत गीत गाऊन केले. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांनी अरेबिक डान्स, चिकन डान्स, पिरॅमिड, लेझीम,मल्लखांब असे धाडसी खेळ सादर करून पालकांचे व प्रमुख पाहुण्यांचे मने जिंकली.तसेच राष्ट्रगीत आणि मार्च पास करून मैदानी खेळायला सुरुवात झाली.
या क्रीडा दिनानिमित्त लोटस इंग्लिश स्कूलचे अनेक पालक वर्ग उपस्थित होते विद्यार्थ्यासोबत पालकांनी सुद्धा सर्व खेळांमध्ये सहभाग नोंदवला पालकांची लिंबू चमचा,संगीत खुर्ची, क्रिकेट मॅच या पालकांनी स्पर्धेमध्ये विजय संपादन केला. विजय संपादन केलेल्या पालकांची नावे पुढीलप्रमाणे लिंबू चमचा स्पर्धा दीपक नाईक नवरे प्रथम क्रमांक, तानाजी देशमुख द्वितीय क्रमांक, विनोद पवार तृतीय क्रमांक, संगीत खुर्ची स्पर्धा,दीपक नाईक नवरे प्रथम क्रमांक,विजयकुमार मदने द्वितीय क्रमांक, आजीत नामदे तृतीय क्रमांक,या पालकांना संस्थेचे सदस्य सूरज रोंगे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. तर ज्या महिलांनी स्पर्धेत विजय संपादन त्या महिलांना स्कूलच्या प्राचार्य डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धेतील विजयी महिलांची नावे पुढीलप्रमाणे लिंबू चमचा स्पर्धा जयश्री पवार प्रथम क्रमांक,उषा दळवी द्वितीय क्रमांक,राणी रोंगे तृतीय क्रमांक,संगीत खुर्ची स्पर्धा अस्मिता बागल प्रथम क्रमांक, डॉ.संध्या पाटील चोपडे द्वितीय क्रमांक,सुप्रिया कवडे तृतीय क्रमांक,रनिंग स्पर्धा काजल सुळे प्रथम क्रमांक,अस्मिता बागल द्वितीय क्रमांक,किशोरी भोसले तृतीय क्रमांक,तर पालक विरुद्ध शिक्षक क्रिकेट मॅच खेळामध्ये शिक्षकांनी विजय संपादन केला. आणि विजय संपादन केला.
तसेच नर्सरी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख सचिन निकम, संतोष गाढवे, ज्ञानेश्वर वायदंडे,गजानन व्यवहारे,रहीम मुलानी,अमीर इनामदार, महिला क्रीडा शिक्षिका अस्मिता घोलप यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मोरे,प्रज्ञा कांबळे,राजकुमार बंडगर,यांनी केले तर आभार प्रदर्शन संपत लवटे यांनी केले. विजयी पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागल संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी केले.