महामार्गावरील वाहनांना लुटणारी टोळी गजाआड
जयराम घाडगे,वेळापूर प्रतिनिधी,
वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे फळवणी शिवारातील साळमुख ते सांगोला जाणाऱ्या रोड वरून वाहन चालक शुभम तिलोकसिंह यादव हे ट्रक घेऊन जात असताना फळवणी शिवारात निरा कॅनॉल जवळ रोडवर तीन इसमाने मिळून वाहन अडवून वाहन चालकास शिवीगाळ दमदाटी करीत खाली ओढून हाताने मारहाण करून तुझ्याकडे असलेले पैसे काढून दे नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन खिशातील १३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहे.
अशी माहिती मिळताच वेळापूर पोलीस ठाण्याकडील पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा फिर्यादीने सांगितलेल्या वर्णा प्रमाणे शोध घेतला असता साळमुख चौकात वेळापुर पोलिसांना पाहताच संशियीत पळू लागल्यावर त्याचा पाठलाग करून पकडले.
सदर बाबत वेळापूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२३ भा द वि कलम ३९२ ३४१ ३२३ ५०४ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून नमूद गुन्ह्यातील आरोपी अजित सुभाषराव जाधव मळोली, सुहास समाधान यादव व महेश विष्णू कदम दोघे राहणार तांदुळवाडी तालुका माळशिरस यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्येमाल हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूज पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे, वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, पोहेकाॅ उमाजी चव्हाण, पोहेकाॅ दीपक मेहकर, पो.ना. अमोल वाघमोडे यांनी सदरची कामगिरी केली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत हे करीत आहेत.