मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
महाराष्ट्र विदया विकास मंडळ कुर्ल्याचे सचिव शिक्षणमहर्षी स्वर्गीय द.ना. सामंत साहेब यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र विद्या विकास मंडळ कुर्ला सर्व संकुलांच्यावतीने मोफत भांडी, कपडे, अन्नधान्य व शालेय वस्तूंचे वाटप शुक्रवार दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. मुक्काम डोंगरी पाडा, चिनचेंचा पाडा पोस्ट : फळेगाव तालुका : कल्याण जिल्हा : ठाणे करण्यात आले.
विमा पॉलिसी संपर्क - 8329354008
यावेळी महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे सचिव श्री. सत्येंद्र सामंत शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव यादव, श्री. धुळाजी दडस पर्यवेक्षक श्री. सतेश शिंदे सहाय्यक शिक्षक श्री.उद्धव अमुप,दादासाहेब वळकुंदे, धनराज चौधरी,धनम मॅडम, अक्षया कांबळी, पूर्वा तळपाडे, योगिता हिरवे, रेखा प्रभू ,आशिष यादव, वाक्षे सर, पाटील सर, सनई सर,निलेश रोकडे, तानाजी धनावडे व स्वराज्य रणरागिणी ग्रुपच्या स्वरा गुजरे, स्वाती मालपेकर, कोमल गुजरे व पाड्यावरील लहान मुले, महिला व पुरुष उपस्थित होते.
सर्व उपस्थितांच्या हस्ते वस्तूंचे वितरण करण्यात आले. पाड्यावरील लोकांच्या समस्या तसेच लहान मुलांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेऊन त्या पुढील काळात अधिकाधिक सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे उपस्थितांच्या वतीने सांगण्यात आले. सर्व उपस्थित बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यास मिळाला सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.