भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सावंत परिवाराच्या वतीने रचना गारमेंटचा उद्घाटन समारंभ युनियन बँकेचे शाखाधिकारी सचिन बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सविता लोखंडे माजी सरपंच शिंदे ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे माने डॉ.सौ. लाले, हनुमंत लिंगे, गणपत जाधव, प्रशांत माळवदे,अभिनंदन दानोळे,संतोष सावंत,विजय सावंत, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बनसोडे म्हणाले ,सावंत परिवाराच्या वतीने सुरू केलेल्या रचना गारमेंटच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे हे अत्यंत चांगली गोष्ट आहे अशा व्यवसायास बचत गटाच्या माध्यमातून कर्जही उपलब्ध करून देता येत आहे.
यावेळी सुजाता रामचंद्र सावंत म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून या गारमेंटचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या यामधून 25 महिलांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यात या व्यवसायात वाढ करून 100 ते 200 महिलांना यातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर प्रकल्प सुरू करण्यास युनियन बँकने 25 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे.या व्यवसायास 50 लाख रुपये भाग भांडवल लागणार आहे.याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले तर आभार रामचंद्र सावंत यांनी मानले.यावेळी बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.