पंढरपूर प्रतिनिधी
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रभारी मितेंद्र सिंह, यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय, गांधी भवन कुलाबा येथे सदर निवडीचे पत्र देण्यात आले. सहप्रभारी प्रदीप सिंघव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, अनिकेत म्हात्रे, वंदना बेन आदी उपस्थित होते.
शंकर सुरवसे यांनी यापूर्वी पंढरपूर शहर सरचिटणीस, शहर अध्यक्ष व युवक जिल्हा कार्याध्यक्ष पद भूषवले आहे त्यांची पंढरपूर शहर व सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस च्या कार्य काळातील केलेल्या कामाची दाखल घेऊन त्यांना महाराष्ट्र प्रदेश बॉडी वर काम करण्यांची संधी देण्यात आली आहे.