भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथील श्री भवानी देवी मंदिराच्या सभा मंडपासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फंडातून 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभा मंडपाच्या बांधकामाचे भूमी पूजन युवा नेते दिग्विजय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी भगवानराव चौगुले, हरिभाऊ शिंदे,शिवाजी बाबर, धनंजय काळे, सरपंच राजकुमार पाटील, सुनील पाटील, बाळू गवळी,सचिन कूचेकर, भोजलींग बाबर,निहाल शेख,सचिन भोसले,सोमा पाटील,बंडू पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.