मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
दिनांक २७ ते ३० डिसेंबर २०२२ रोजी अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव झाला.संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पारखी सर ,शिक्षण प्रकल्प प्रमुख श्रीकांत खंडकर सर तसेच सुनील जाधव सर यांचे मार्गदर्शन या क्रीडा महोत्सवास लाभले. धावणे स्पर्धा जाधव सरांच्या व अडथळा शर्यत पारखी सर व खंडकर सरांच्या निरीक्षणाखाली पार पडली. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पी. एस.आय.अरुण साठे व बांदिवली शाळेचे मुख्याध्यापक दीपक पाडावे सर यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्पर्धा धावणे,अडथळा शर्यत,इंग्रजी अक्षरओळख,नाणी ओळखणे
सांघिक खेळ लंगडी स्पर्धा,पालकांसाठी तोल सांभाळणे व बटाटा शर्यत तसेच शिकांसाठीही स्पर्धा घेण्यात आल्या.पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पारितोषिक वितरण समारंभासाठी सूर्यकांत सालम-कबड्डी व शरीरसौष्ठव पट्टू, राष्ट्रीय खेळाडू इन्कम टॅक्स कार्यालय मुंबई , संचालक सालम जिम जोगेश्वरी, प्रशांत सडेकर आनंद पांडे २१ वर्षाखालील ज्युनिअर मुंबई श्री जुनियर महाराष्ट्र श्री जुनियर भारत श्री, योगेश वायंगणकर
एस. आर. पी. एफ. पोलीस ,भारत उदय श्री चे मानकरी उपस्थित होते.सूर्यकांत सालम यांच्या तर्फे पालकांना मेडल देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका रचना पवार यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.सर्व विजेत्यांचे मेडल प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.त्यांच्या तर्फे सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.