पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील लहान मुलांसाठी देवदूत अशी उपाधी लाभलेले पंढरपूर शहर व तालुक्यात गेल्या 45 वर्षापासून वैद्यकीय सेवा देऊन हजारो बालकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर शितल के शहा यांना 74 वा प्रजासत्ताक दिनी गुरुवार दिनांक 26 जानेवारी रोजी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008यावेळी जिल्हा परिषद चे सीईओ दिलीप स्वामी महानगरपालिका आयुक्त शितल तेली पाटील व इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते डॉक्टर शितल शहा यांना या पुरस्काराप्रमाणेच त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत.
तसेच राज्यात नव्हे तर परराज्यात देखील डॉ शितल शहा यांचे मोठे नाव आहे. अनेक असाध्य व्याधींवर यशस्वी उपचार करून गंभीर परिस्थितीत असणाऱ्या लहान बालकांचे जीव डॉ शितल शहा यांनी वाचवून त्यांना नवजीवन दिले आहे. तरी त्यांच्या यशाबद्दल पंढरपूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे यामुळे पंढरपूर तालुक्याचे नाव राज्यात गाजत आहे