सांगोला प्रतिनिधी
शेतकरी सहकारी सुत गिरणीचे पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली .
सदर निवडीमध्ये एकुण सतरा जागा पैकी 14 जागा शेतकरी कामगार पक्षाच्या बिनविरोध झाल्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 जागा बिनविरोध निवड झाल्या तसेच शिवसेना-शिंदे गट यांना 1 जागा बिनविरोध करण्यात आली आशा प्रकारे सर्वच्या सर्व सतरा जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले...
स्व. आबासाहेबांच्या निधनानंतर शेतकरी सहकारी सुत गिरणी व आता खरेदी विक्री संघ बिनविरोध करण्यात शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे.
सदर निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या संयमी नेतृत्वाची झलक दाखवुन आपण आबासाहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकत समाजसेवा व राजकारण करीत असलेचे पुंन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले.
सदर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ नेते भाई चंद्रकांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले...तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या राज्याचे नेते भाई बाबासाहेब करांडे,तालुका चिटणीस भाई दादाशेठ बाबर,भाई बाळासाहेब काटकर,भाई मारुती बनकर,भाई बाळासाहेब एरंडे,भाई बाळासाहेब पाटील, अँड भाई नितीन गव्हाणे, इत्यादी नेत्यांनी प्रयत्न केले.
बिनविरोध निवड झालेल्या मध्ये 1)दिपक दत्तात्रय चोथे-शेकाप 2)बाबर विशालदिप विजयसिंह-शेकाप 3)चोरमले बिरा रामचंद्र-शेकाप 4)भुसनर तुकाराम गणपत -शेकाप 5)केदार वैभव जगन्नाथ-शेकाप6)येलपले प्रल्हाद सोपान-शेकाप 7)गडदे पोपटी रामचंद्र-शेकाप 8)जगताप नारायण शिवाजी-शेकाप 9)जानकर धोंडीबा यशवंत-शेकाप 10)हातेकर मारुती तुकाराम-शेकाप11)जाधव-पाटिल रमेश पांडुरंग-शेकाप 12) लोखंडे उषादेवी सिध्देश्वर-शेकाप 13)भोसले कृष्णदेव पांडुरंग-शेकाप 14)इंगोले हरिबा यशवंत-शेकाप 15) पाटील सुभाष कृष्णदेव-राष्ट्रवादी 16)कोळवले सिंधु विठ्ठल- राष्ट्रवादी 17)ताटे चंद्रशेखर भिमाशंकर -शिवसेना शिंदे गट