हडपसर प्रतिनिधी
हडपसर येथील के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रॉयल मिडिया न्यूज व महाराष्ट्र खबर न्यूज चॅनेलचे संपादक तुकाराम गोडसे यांना के.पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष एड. कृपाल पलुसकर यांच्या हस्ते शब्दयोद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार तुकाराम गोडसे यांच्या हस्ते के.पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सकाळचे पत्रकार कृष्णकांत कोबल,लोकहीत न्यूजचे संपादक नितीन जाधव, पुढारीचे पत्रकार प्रमोद गिरी, आपली चळवळ चे संपादक गोरक्ष गायकवाड, पितांबर धिवार उपस्थित होते.
पत्रकार तुकाराम गोडसे यांना शब्द योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल तेज न्यूज परिवार कडून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.