पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील अनवली हे तसे मोठे व सधन गाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सरपंच पदी महिलांसाठी आरक्षित असल्याने या जागेवर याच गावच्या सुमन गजेंद्र शिंदे या सरपंच पदी विराजमान झाल्या त्या नावालाच त्यांचे पती गजेंद्र शिंदे यांना सरपंच म्हणून मिळवण्याची भारी हाऊस त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये जाऊन कोणताही अधिकार नसताना सरपंचाच्या खुर्चीवर बसून कार्यालयीन कामकाज काही वेळा पार पाडतात.
याला तेथील ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांची मुखपसंती तर नाही ना असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असून याबाबतचे लेखी तक्रार याच गावचे रामदास पांडुरंग डोंगरे यांनी जिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी महसूल आयुक्त यांच्याकडे केली असून ग्रामपंचायतीचा कारभार अनधिकृतपणे पाहणाऱ्या गजेंद्र आत्माराम शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
अनवली येथील गायरान गट नंबर 289 ही मालमत्ता ग्रामपंचायत नावे दिसून येत आहे याच जमिनीतून रामदास डोंगरे यांच्या वस्ती कडे जाण्याचा रस्ता आहे तो या तिघांनी मिळून अनाधिकाराने बंद केला आहे त्यामुळे गावातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे वास्तविक पाहता अनवली ग्रामपंचायतच्या सरपंच या सुमन शिंदे असताना त्यांना बाजूला सारून आपणच सरपंच आहे असा भास निर्माण करून सरपंच पदाची खुर्ची गेल्या अनेक दिवसापासून दबाव निर्माण करून चालवत आहेत एवढेच नाही तर कायद्याने जो अधिकार सरपंचांना दिला आहे तो हिरावून घेऊन स्वतः सरपंच असलेल्या सुमन शिंदे यांच्या अधिकारावर गदा आणून गजेंद्र शिंदे स्वतः सही करत आहेत हा सर्व कारभार अनाधिकृतपणे चालू असून तो उघड्या डोळ्यांनी ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी पाहत आहेत.
यामुळे शासनाची तर फसवणूक होत आहेत परंतु बनवली ग्रामवास यांची फसवणूक होत आहे सरपंच असलेल्या सुमन शिंदे यांच्या खुर्चीवर बसून सरपंच तिच्या थाटात गजेंद्र शिंदे हे ग्रामपंचायत कार्यालयात वावरत असून त्याचे फोटोही अनेक आणि काढलेले आहेत हा सरळ सरळ शासनाचा आणि ग्रामपंचायतीचा कायद्याने अपमान असून याबाबत गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काही महत्त्वाच्या कागदपत्रावर सुमन शिंदे यांच्या ऐवजी शासकीय कामकाजाच्या कागदपत्रावर गजेंद्र शिंदे आणि सह्या केल्याचे गावामध्ये चर्चिले जात आहे हा सरळ सरळ कोणताही अधिकार नसताना अनाधिकृत पणे अधिकृत सरपंच असल्याचा आवाहन हे महाशय कामकाज चालवत आहेत.
तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कायदेशीर कारवाई करून असताना ग्रामस्थांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी रामदास डोंगरे यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्याकडे केले असल्याने अनवली गावात खळबळ उडाली आहे