दि ०२जानेवारी २०२३ ते ०७ जानेवारी २०२३ या दरम्यान महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त चिन्ह याबाबत मार्गदर्शन केले.
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने २ जानेवारी २०२३ पासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मा श्री शिरीष सर देशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माश्री हिम्मतराव जाधव अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. श्री विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर, मा. श्री मिलिंद पाटील पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मौजे आणवली येथील सतु कृष्णा केनी विद्यालय, अनवली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक, वापर करताना घ्यावयाची दक्षता, आपली वैयक्तिक व खाजगी माहिती आवश्यकता नसल्यास शेअर करू नये.
सोशल मीडिया वरून देण्यात येणारे वेगवेगळे आमिषे यांना बळी पडू नये. सोशल मीडियाच्या बाबतीत सजगता हाच सुरक्षेचा उपाय असल्याचे यावेळी विद्याथ्र्यांना सांगण्यात आले. गुड टच व बॅड टच याबाबत माहिती सांगितली. महिला व विद्यार्थीनी कोणत्याही व्यक्ती छेडछाड करीत असेल तर निर्भया पथकाला अथवा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याबाबत आवाहन केले. वाहतूक शाखेकडील पोलीस अंमलदार श्री नरळे व जगताप यांनी पंढरपुर -मंगळवेढा रोड वर वाहतूक नियमाबाबत प्रात्यक्षिक दाखवले वाहतूक नियम व
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यपक श्री डोईफोडे सर, श्री करणावर सर सूर्यवंशी सर शिंदे सर डामसे सर पोलीस नाईक माळी नरळे, पोकॉ जगताप व पोलीस पाटील तोफिक शेख हजर होते.