पंढरपूर प्रतिनिधी
माघवारी पालखी सोहळा 2023 प्रतिवर्षी प्रमाणे " ज्ञानोबा तुकाराम" या गजरा मध्ये पायी चालत पंढरपूर कडे मार्गस्थ झाला होता. या सोहळ्यामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून 2012 साली रिंगण सोहळा सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारी मध्येच फक्त रिंगण सोहळा होत असतो. त्यासर्व परंपरेला आदर्श मानून उभे रिंगण पंढरपुर प्रवेश करताना सुरू केले आहे.
ही परंपरा सुरु करुन 12 वे वर्ष आहे. तप: पूर्ती वर्ष असल्यामुळे सर्व दिंडी प्रमुख व अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये जलाराम महाराज मठ, पंढरपूर येथे उभे रिंगण आनंदात संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांच्या व सुधाकर महाराज इंगळे ( राष्ट्रिय अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाने रिंगण सोहळा संपन्न झाला.
किरण चीप्पा महाराज , विष्णु महाराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय पवार ( शहर अध्यक्ष), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष), निवृत्ती मोरे (शहर कोषाध्यक्ष), सचिन गायकवाड (शहर उपाध्यक्ष) , हरिहर मोरे , बालाजी कोटा , यतिराज जाधव, ई. पदाधिकारी यांच्या परिश्रमाने संपन्न झाला. माघवारी मध्ये उभे रिंगण सुरू करुन इतर वारीला खुप मोठा आदर्श निर्माण केला आहे. वारकरी भाविक या रिंगण सोहळा संपन्न झाल्या नंतर आनंदी होऊन मार्गस्थ झाले.