वर्धा प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील सेलू मतदार संघाचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मंगळवेढा येथील आवताडे फार्म हाऊसला भेट दिली असता पंढरपूर मंगळवेढा विधान सभेचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले.
सदर प्रसंगी मतदार संघाचे आराध्य दैवत असणारे श्री.विठ्ठल व श्री. संत दामाजी पंताची मूर्ती देऊन आमदार डॉ.पंकज भोयर व सौ.शितल भोयर यांचा सपत्नीक सत्कार केला.यावेळी विविध मान्यवर व राजकीय मंडळी उपस्थित होते.