जळगाव जिल्हा प्रतिनिधी
भागवत धर्म प्रसारक समिती व पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) या जगातील पहिल्या महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , हरियाणा व पंजाब अशा सुमारे २५०० किलोमीटर आध्यात्मिक सायकल यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या सायकल यात्रेचे आयोजन केल्याबद्दल अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांचा जळगांव येथे श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने मानपत्र देवून सन्मान करण्यात आला .
यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.