पालघर प्रतिनिधी उदय वाघवणकर
बुधवार दिनांक - ०४ जानेवारी रोजी ऑल इंडिया ओबीसी रेल्वे असोसिएशन पश्चिम रेल्वे लोअर परेल - महालक्ष्मी शाखा सभासद कार्ड उद्घाटन तथा सेवानिवृत्त कामगार विजय करगुटकर यांचा जाहीर सत्कार आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला झोनल अध्यक्ष रामनाथ पाटील यांच्या हस्ते सभासद कार्डचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी झोनल अतिरिक्त महासचिव संजय मडवे, लीलाधर भोईर (झोनल कार्यालय सचिव), गोरक्षनाथ सानप (झोनल खजिनदार)उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा - अध्यक्ष विनायक म्हात्रे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद बाऊल, मनोज रहाटे, आनंद पाटील, प्रफुल्ल महाले, सूर्यकांत माजगावकर, शक्ती समेळ यांनी अथक मेहनत घेतली होती.