भाळवणी प्रतिनिधी
मेट्रोब्रेन अबॅकस संचलित ५वी नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षा २२ जानेवारी २०२३ रोजी नांदेड या ठिकाणी घेण्यात आली. या स्पर्धेत भाळवणी ता.पंढरपूर येथील सुखकर्ता अबॅकस सेंटरला घवघवीत यश मिळाले आहे.
या स्पर्धेत देशभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सुखकर्ता अबॅकस सेंटरचे 02 विद्यार्थी 2nd Topper व 02 विद्यार्थी 4th Topper ठरले. एकूण सात विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते व सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले. या सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, ट्रॉफी व सर्टीफिकेट मिळाले.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008
ते विद्यार्थी पुढीलप्रमाणे - ज्ञानेश्वरी कृष्णा कारंडे, जान्हवी पांडुरंग जमदाडे, पृथ्वीराज रुद्रमणी जाधव, निरंजन सोमनाथ कांबळे, विश्वजीत रणजीत जाधव, ईश्वरी वैभव कारंडे, आयुष अंकुश गोरे.
यांना सुखकर्ता अबॅकस सेंटरच्या संचालिका मनिषा कथले यांचे मार्गदर्शन लाभले, कथले यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आले. या सर्वांचे अभिनंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष मेट्रो ब्रेन अबॅकस चे संस्थापक संतोष लोहारे व सीमा लोहारे यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.