मोहोळ प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती तालुका मोहोळची बेगमपूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत इत्यादी विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती तालुका मोहोळची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
विमा पॉलिसी संपर्क - 8329354008तालुका अध्यक्ष अमर पवार उपाध्यक्ष बंडू तोडकर सचिव ज्ञानेश्वर गवळी कार्याध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर कोषाध्यक्ष सागर पवार यांना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते ओळखपत्र शाल पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जेष्ठ पत्रकार बाबा काशीद आर न्यूज नेटवर्क चे संपादक डॉक्टर रवींद्र सोरटे अजय तोडकर इत्यादी उपस्थित होते