पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित आज दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी लोटस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला भेट दिली.
यामध्ये SLR रायफल Gas Gun, बुलेट्स यांची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी A.P.I ए.एम. खरात साहेब यांनी दिली तसेच crime and criminal tracking network system internet याचे काम कसे चालते त्याची देखील माहिती दिली.तर पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते.F.I.R. म्हणजे काय,ठाणे अंमलदाराचे काम कोणते असते, बिनतारी संदेश,दप्तरी कक्ष, C.C.T.N.S म्हणजे काय, बारनिशी चे काम कसे असते.
गुन्हा केल्यानंतर आरोपीला कधी अटक करायची याची देखील सर्व सर्व माहिती पोलिस नाईक जी.बी.माळी साहेब यांनी दिली. विद्यार्थ्यांना ही माहिती देताना PSI मोरे साहेब,ठाणे अंमलदार चंदनशिवे साहेब,पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार साहेब, शिक्षक संपत लवटे,सचिन निकम,दयानंद जाधव,उपस्थित होते.
स्कूल मधील विद्यार्थ्यांना माहिती दिल्याबद्दल स्कूलच्या डॉ.प्राचार्या जयश्री भोसले,अध्यक्ष एच.एम. बागल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी रोंगे,उपाध्यक्ष बी.डी. रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.