पंढरपूर प्रतिनिधी
मौजे कासेगाव ता पंढरपुर गावचे हद्दीतील जुने कासेगाव रोडवरील दगडाचे खानी जवळील कॅनॉलचे बाजुस असलेले निर्मनुष्य ठिकाणी अफजल बागवान याचे डोळयात चटणी टाकुन त्यांचे अंगावर पेट्रोल ओतुन त्यास पेटवुन देवुन त्यांचा दगडाने ठेचुन खुन करणाऱ्या मयत अफजल बागवान याचा मुलगा सोहेल बागवान व इतर ०२ अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल दि. ३० / १२ / २०२२ रोजी रात्रौ ९:३० वाजणेचे सुमारास मौजे कासेगाव येथील बळीराजा कोल्ड स्टोअरेज जवळील शाम सुखसे हे दुध डेअरी मध्ये दूध घालुन परत येत असताना महेश साठे यांचे खडी क्रशर जवळ आले असताना त्यांना कॅनॉल कडील बाजुने वाचवा वाचवा असा आरडा-ओरडा केल्याचा आवाज आलेने त्यांनी आवाजाचे दिशेने पाहिले असता त्यांना अचानक जाळाचा भडका उडाल्याचे दिसले.
त्यांनी घरी गेलेवर सदर बाबत त्यांचे वस्तीवरील नितीन गवळी यांना सांगीतले. नितीन गवळी यांनी कासेगावचे पोलीस पाटील यांना सदर बाबत कळविलेवर पोलीस पाटील यांनी त्यांना लक्ष ठेवण्यास सांगीतले व त्यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस कळविले.
नंतर तात्काळ पोलीसांनी घटनास्थळी गेलेवर तेथे बळीराजा कोल्ड स्टोअरेज येथे पोलीस पाटील कासेगाव व जमलेल्या लोकांनी ०२ अल्पवयीन मुलांना थांबवुन ठेवले होते. त्यांचेकडे पोलीसांनी चौकशी केलेवर ते लातुर येथे असलेचे व त्यांनी दाळे गल्ली येथील अफजल बागवान यास मारल्याचे सांगीतले. सदर ठिकाणी जावुन पाहता एक ५० वर्षे वयाचा इसमाचे डोके, चेहरा दगडाने ठेचलेने चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. तो रक्ताच्या थोराळयात पडला होता. त्याचा चेहरा, छाती व दोन्ही हात भाजलेचे दिसत होते तसेच पाय नायलॉनचे दोरीने बांधले होते. सदर अल्पवयीन मुलांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी ते पंढरपुर येथे राहत असताना त्यांचे वडीलांचे निधन झालेवर त्यांचे गल्लीतील अफजल बागवान व आमचे मम्मीचे प्रेमसंबंध झाले होते.
त्यामुळे तो एकसारखा आमचे घरी येवुन आम्हाला त्रास देत होता म्हणुन त्यास आम्ही मामाचे घरी जायचे आहे तुम्ही आमचे सोबत चला सांगुन कचेरी जवळुन जुना कासेगाव रोड वरील म्हसोबा मंदीरापर्यत रिक्षातुन घेवुन गेलो व तेथुन पायी चालत जात असताना त्याचे डोळयात चटनीची पुड टाकुन त्यांचे अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिले. तो पळु लागलेवर त्याचे पाय दाव्याने बांधुन त्याचे चेहऱ्यावर डोकीत दगडाने मारून त्याचा खुन केला असलेचे सांगीतलेने दौलतराव आप्पासाहेब जाधव (पोलीस पाटील) कासेगाव यांनी दिले.
फिर्यादीप्रमाणे भा द वि कलम ३०२, ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक सो श्री. शिरीश सरदेशपांडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव सो, उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करून अल्पवयीन मुलांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचेकडे गेले गुन्हयाचा तपास करता त्यातील अल्पवयीन मुलीने तिचे आणी मयत अफजल महमह शरीफ बागवान याचा मुलगा सोहेल अफजल बागवान यांचेमध्ये प्रेमसंबंध असलेचे व ते दोघेजण लग्न करणार होते परंतु त्यास अफजल याचा विरोध असलेने सोहेल याचे सांगणेवरून सदर अल्पवयीन मुलगी व तिचा अल्पवयीन भाउ हे दोघेजण दि. २९/१२/२०२२ रोजी लातुर येथून रात्री ११:०० वाजता रेल्वेने निघुन दि. ३०/१२/२०२२ रोजी सकाळी पंढरपुर येथे पोहोचले. त्यानंतर त्यांची व सोहेल बागवान यांची एस टी स्टँड समोरील गल्ली मध्ये भेट झाली.
त्या ठिकाणी ठरले प्रमाणे अल्पवयीन मुलीने व तिच्या भावाने मयत अफजल यास कचेरी येथुन कासेगाव येथील घटनास्थळी घेवुन गेले. तेथे अगोदरच सोहेल बागवान हा जावुन थांबला होता. अल्पवयीन मुलीने व मुलाने अफजल बागवान याचे डोळ्यात चटनी टाकलेवर सोहेल बागवान याने सोबत आणलेले पेट्रोल अफजल बागवान याचे अंगावर टाकुन त्यास पेटवुन दिले.
तो पळु लागलेवर त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन खाली पाडुन त्याचे पाय बांधुन त्याचे चेहयावर व डोक्यात अल्पवयीन मुलांनी व सोहेल बागवान याने दगडाने ठेचुन अफजल बागवान याचा खुन केला असल्याचे निष्पन्न झालेने गुन्हयाचे कामी अल्पवयीन मुलगी व मुलास ताब्यात घेवून सोहेल बागवान याचा शोध घेवून त्यास गुन्हयाचे कामी अटक केली असुन गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलींद बी पाटील हे करीत आहेत.