पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीच्या दिवशी (शनिवार, दि. १४/०१/२०२३ रोजी) श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ३ ते ४ या वेळेत करण्यात येणार आहे.
भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल तर त्यांनी पहाटे ४ ते ५.३० या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे ५.३० नंतर श्री रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार घातले जातील. सकाळी ६.१५ वाजता पदस्पर्श दर्शन सुरू करणेत येईल, तसेच भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दि. १६/०१/२०२३ रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत करणेत येईल. पदस्पर्श दर्शन पहाटे ५.४५ नंतर सुरू करणेत येईल.
दि. १५/०१/२०२३ रोजी मकर संक्रांतीनिमित्त जास्तीत जास्त भगिनींना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्यावतीने करण्यात आले आहे.