पंढरपूर प्रतिनिधी
आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी नगरपालिका शाळा क्रमांक आठ व 15 पंढरपूर येथे आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले.
याप्रसंगी ऍडव्होकेट वंदना कोष्टी मॅडम, निशा कलढोणे मॅडम, डॉक्टर अर्चना साळुंखे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री देशमुख सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी टेळे सर यांनी पार पाडली.ऍडव्होकेट कोष्टी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंनी महिलांच्या विकासाची दारे कशी खुली केली याबद्दल माहिती सांगितली.मुलींनी आपल्या प्रयत्नातून उच्च स्वप्ने साकार करण्यासाठी सतत सावित्रीबाईंनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
डॉक्टर कलढोणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, चांगल्या आहाराविषयी मार्गदर्शन केले तसेच बाल सुरक्षा कायद्याविषयी माहिती सांगितली. डॉक्टर अर्चना साळुंखे यांनी आपल्या मार्गदर्शनातून भारतीय इतिहासामध्ये अजरामर कामगिरी केलेल्या महिलांची माहिती सांगितली. आजच्या बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध, भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. बरीच मुले-मुली बाल ज्योतिबा व बाल सावित्रीच्या रूपात आल्यामुळे कार्यक्रम अधिक उठावदार झाला.नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक नरळे सर, सोनवले सर, गंगनमले सर, देशमुख सर देशमुख मॅडम, टेळे सर, घाडगे सर, सादिगले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.