पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहर व परिसरातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 7 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
जिल्हा नियोजन समिती मधून 2022-23 साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर शहर परिसरातील रस्ते खडीकरण, डांबरीकरण व अग्निशमन इमारत बांधकाम आदी कामांसाठी 7 कोटी 12 लाखांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
एम.एस.ई.बी.ऑफीस ते तनपुरे महाराज मठ ते कन्या प्रशाला रस्ता खडीकरण डांबरीकरण, भक्त निवास ते स्टेशन रोड रस्ता खडीकरण डांबरीकरण, प्रशांत परिचारक नगर मधील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, गट.नं.100 कासेगाव ते कचरा डेपो रस्ता खडीकरण डांबरीकरण, विठ्ठल नगर, मानस नगर, येळे वस्ती येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, गुरूदेव नगर येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, मनिषा नगर कुंभार घर ते सयाजी आसबे घर रस्ता खडीकरण मुरमीकरण, पद्मनाथ मंगल कार्यालय ते सुनिल पाटील मळा ते एकता नगर रस्ता खडीकरण डांबरीकरण, पवार वस्ती ते पश्चिमेकडे वांगीकर नगर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण या रस्त्यासाठी एकुण 5 कोटी 22 लाख रूपये मंजूर झाला आहे.
तसेच दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सन 2022-23 भिंगे चौक ते वैभव हार्डवेअर शॉप रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, अग्निशामन कार्यालय परिसर ट्रँक व रोड विकसित करणे, गणपती हॉस्पिटल ते टकले हॉस्पिटल नविन कराड नाका रस्ता खडीकरण डांबरीकरण याकामासाठी 1 कोटी 16 लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. व अग्निशामन जिल्हा स्तरावरून सन 2022-23 अग्निशामन इमारत उर्वरित बांधकाम पुर्ण करण्यासाठी 73 लाख 90 हजार रूपये मंजूर झाला आहे.