ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
- नाशिक जिल्हयात सामाजीक कार्यासाठी प्रसिद्ध असणार्या आधारस्तंभ प्रस्तुत '' विश्वकर्मा आधारस्तंभ दिनदर्शिका 2023 '' चा प्रकाशन सोहळा नव वर्षाच्या प्रारंभीच घोटी शहरात मोठया उत्साहात संपन्न झाला.
'मानवसेवा हिच खरी ईश्वरसेवा'' हा ध्यास ठेऊन समाजातील गरजू घटकांना निस्वार्थ मदत करत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने 'विश्वकर्मा आधारस्तंभ' हा सामाजिक व्हाट्सअप ग्रुप 14 मे 2021 रोजी स्थापन करण्यात आला आहे.
या अनुषंगाने आधारस्तंभ प्रस्तुत '' विश्वकर्मा आधारस्तंभ दिनदर्शिका 2023 '' चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
गेली अनेक वर्ष तंत्रज्ञानाच्या वाढत्या बदलामुळे सुतार आणि लोहार समाजाच्या कामावर दुष्परिणाम झालेला आहे. कारण त्यांच्या अवजारांची जागा आता मशीनने घेतलेली आहे .त्यामुळे आपले वडिलोपार्जित व्यवसाय सोडून अनेक तरूण शहरात जाऊन नाईलाजाने मिळेल ती नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. याव्यतिरिक्त समाजातील अनेक समस्या या प्रकाशनच्या निमित्ताने जाणून घेतल्या.
वाढते आधुनिकीकरण,शिक्षण, बेरोजगारी तसेच व्यवसायाचे महत्व याचे योग्य मार्गदर्शन आधारस्तंभच्या सभासदांनी केले. समाज्यातील तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देखील आधारस्तंभच्या सभासदांनी केले.
यावेळी ह भ प निवृत्ती महाराज काळे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज क्षीरसागर, प्रकाश बोराडे , संदीप कान्हव , गणेश बोराडे , मोहन क्षीरसागर , ज्ञानेश्वर क्षीरसागर, विष्णू वाकचौरे, निलेश बोराडे, प्रमोद क्षीरसागर आणि महेंद्र कान्हव आदी सभासद उपस्थित होते.