शिक्षणाची दशसुत्री अंतर्गत किरण बाबर यांची कुर्डुवाडी येथे कार्यशाळा संपन्न
पिंपळनेर प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या अध्यापक विद्यालय व शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कुर्डुवाडी येथे जिल्हा परिषद, सोलापूर आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,वेळापूर यांच्या नियोजनानुसार पंचायत समिती कुर्डुवाडी यांच्यावतीने निपुण भारत व शिक्षणाची दशसुत्री उपक्रमांतर्गत कृतियुक्त वाचन, लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूरचे अधिव्याख्याता डॉ. इब्राहिम नदाफ,डॉ. शशिकांत शिंदे,श्री. तुळजाभवानी अध्यापक महाविद्यालय,कुर्डुवाडी चे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. रविकिरण सुरवसे, गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, जिल्हा समन्वयक नानासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रतिमापुजन करून उद्घाटन करण्यात आले.
कार्यशाळेच्या सुरवातीला डॉ.शशिकांत शिंदे आणि डॉ. इब्राहिम नदाफ यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर अनिल क्षिरसागर यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शक किरण बाबर यांचा परिचय करून दिला.त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक किरण बाबर यांनी १९ खडीचे चित्र, कृती, चित्र व अक्षर शेवटी अक्षर या अध्यापन तंत्राचा कृतियुक्त वापर कशा पद्धतीने करावा यावर सखोल मार्गदर्शन केले. अक्षरे आणि कृती यांचा प्रत्यक्ष कृतीतुन वापर करण्याचे तंत्र सांगितले. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत करणे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार बंधनकारक असल्याने सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचे तंत्र प्रत्येक शिक्षकाने अवगत करावे असे सांगितले. यासाठी 'मी वाचणारच' ही उजळणी उपयुक्त असल्याने तिचा वापर सर्वांनी करावा असे आवाहन केले. चंदाराणी आतकर यांनी कार्यशाळेच्या उपयुक्तता यावर प्रतिक्रिया दिली.
सदर कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली चे शिक्षक,केंद्रप्रमुख स्मिता कुंभार, दिगंबर काळे,रोहिदास कापसे,नागेश भोसले ,तसेच गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील विषयतज्ञ महादेव सोनवणे, सुभाष राऊत,अंकुश पांचाळ,विशेषतज्ञ अभिजीत कसबे,दिपाली माळी, विशेष शिक्षक अजित काळे,अभिजीत वाणी,प्रविण भांगे,वैशाली पडवळ,कौशल्या माने,अरूण गायकवाड,योगिता क्षीरसागर हे उपस्थित होते. सुत्रसंचालन महादेव सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन सवेंद्र लंकेश्वर यांनी केले.