सोलापूर प्रतिनिधी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सोलापूर येथे सकाळी 10.30 वाजले पासून राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वतीने "महा उपभोक्ता लोक अदालत" चे आयोजन करण्यात आले असून, या लोक अदालतमध्ये ग्राहकांनी व पक्षकारांनी सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सोलापूरचे अध्यक्ष अशोककुमार भैसारे यांनी केले आहे.
आपसात वाद मिटवून मानसिक, शारीरिक, समाधान दोन्ही पक्षकारांनी प्राप्त करावे आपसात वाद मिटल्याने आपसातील मतभेद मिटतात. सलोख्याचे वातावरण तयार होते. तसेच वेळेची बचत व पैशाची बचत होते.
ज्या ग्राहकाच्या तक्रारी व प्रकरणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सोलापूरमध्ये प्रलंबित आहेत त्यांनी आपली प्रकरणे आपसात मिटविण्यासाठी दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी महा उपभोक्ता लोक अदालतमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता ग्राहक तक्रार निवारण आयोग, सोलापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे, आवाहन आयोगाने केले आहे.