पंढरपूर प्रतिनिधी
गुरूवार. दि. १५/१२/२०२२ मार्गशिर्ष कृ. ७ रोजी संग्राम शिवाजीराव नवले व पुष्पलता संग्राम नवले राहणार अहमदनगर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस रक्कम रू ५,००,०००/- अक्षरी पाच लाख रूपये रोख देणगी दिली.
त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती च्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते संग्राम शिवाजीराव नवले व पुष्पलता संग्राम नवले यांचा सत्कार "श्री" ची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ देऊन करण्यात आला. त्यावेळी संग्राम नवले व पुष्पलता नवले यांचे नातेवाईक व मंदिरे समितीचे लेखाधिकारी अनिल पाटील व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.