जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव देखील उपोषणास बसणार
पुणे प्रतिनिधी
मंगळवार 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बुधवार पेठ, भिडेवाडा, पुणे येथे भिडेवाडा लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक झाला पाहिजे.या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेकी उपोषणाला बसत आहोत, तरी सर्व संघटना व फुले-शाहू-आंबेडकर प्रेमी या उपोषणाला पाठिंबा द्यावा व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.असे आवाहन महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,सोशल मीडिया प्रभारी सपनाताई माळी शिवणकर यांनी केले आहे.
फुले दांपत्यांनी चालू केलेली पहिली मुलींची शाळा भिडेवाडा याची दुरावस्था झालेली आहे. हा भिडेवाडा शेवटच्या घटका मोजत आहे. तरी देखील प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही, प्रशासन शांततेच्याच भूमिकेत आहे. या सर्वांच्या विरोधात आपण सावित्रीच्या लेकी भिडेवाड्यासाठी उपोषणाला बसत आहोत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी देखील आपल्या उपोषणाला पाठिंबा दिला व ते स्वतः उपोषणास बसणार आहेत.
महाराष्ट्रातून फुले प्रेमी मोठ्या संख्येने येणार आहेत तरी आपण देखील या ऐतिहासिक उपोषणाचा धागा व्हा.
तरी सर्व सावित्रीच्या लेकी व शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे काम करणाऱ्या समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही कळकळीची विनंती.
एक दिवस भिडे वाड्यासाठी
उठ तरुणा जागा हो, या उपोषणाचा धागा हो
दि - 20 डिसेंबर 2022
वेळ - सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
ठिकाण - भिडेवाडा, फरासखाना पोलीस स्टेशन जवळ, बुधवार पेठ, पुणे
यावेळी उपोषणकर्ते सावित्रीच्या लेकी सपनाताई माळी शिवणकर सोशल मीडिया प्रभारी, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,
गौरीताई पिंगळे बेनकर, पुणे शहर कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले
अॅड विद्या शिंदे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,सुनिता भगत ,आदि महिला उपोषणास बसणार आहेत.
कळावे
*#अखिल_भारतीय_महात्मा_फुले_समता_परिषद*
व
*#समस्त_फुलेप्रेमी*