पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी दिव्य साक्षी धोत्रे हिने वजनगट ५० कि.ग्रॅ. अंतर्गत घेण्यात आलेल्या कुस्ती या खेळ प्रकारामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.या स्पर्धा जिजामाता क्रीडा संकुल इसबावी,पंढरपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.
तसेच प्राचार्या जयश्री भोसले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.दिव्यसाक्षीचा स्पर्धेमध्ये विजय मिळवण्यासाठी ज्युनिअर कॉलेजच्या क्रिडा शिक्षिका अस्मिता घोलप आणि ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर वायदंडे यांनी परिश्रम घेतले. आणि तिच्या आई-वडिलांचे मोठे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे,तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,यांनी अभिनंदन केले.