पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी 9 डिसेंबर २०२२ रोजी "रिइनफोर्समेंट लर्निंग" या विषयावर विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे प्रास्ताविक करताना म्हणाले की, शैक्षणिक सत्रामध्ये सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी आणि भविष्यात कंपनीच्या गरजा ओळखून कायम अद्ययावत राहण्यासाठी विविध कल्पकतेला वाव देणाऱ्या वेबिनार व कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयामध्ये नेहमीच आयोजित केले जाते . एन.बी. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. अमोल फाटक यांनी विद्यार्थ्यांना "रिइनफोर्समेंट लर्निंग" संबंधित मार्गदर्शन केले. या व्याख्यानामध्ये रिइनफोर्समेंट लर्निंग संबंधित बेसिक कन्सेप्ट, स्कोप ऑफ रिइनफोर्समेंट लर्निंग, य रिइनफोर्समेंट लर्निंगक्षेत्रातील वेगवेगळ्या करिअर अनेक संधी संदर्भात, तसेच या फिल्डमध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर्स संबंधित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या व्याख्यानामध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील ७५ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. अमोल फाटक यांनी समर्पक उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी घाडगे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. शाम भिमदे यांनी मानले.