पंढरपूर प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. लतिका बागल आदी मान्यवर उपस्थित होते. कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बी. आर. शिंदे, सुपरवायझर युवराज अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यामध्ये विशेष बाब 31 विद्यार्थिनीं व 41 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. याशिवाय 33 शिक्षकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी सॅग भेट दिली. संकलित झालेल्या रक्ताचा लाभ सर्वसामान्य गरजू रुग्णास व्हावा यासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीस he रक्त देण्यात आले. यावेळी डॉ. श्रीमती सोनवणे, डॉ.दिव्या, डॉ. सोनाली, डॉ. मधुरिका, कपिल गायकवाड, प्रकाश साळुंखे, जयेश ओहोळ, शिवराज सुरवसे यांनी वैद्यकीय परिश्रम घेतले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. दत्तात्रय चौधरी, डॉ. बालाजी लोंढे, प्रा. सुमन केंद्रे, राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमुख कॅप्टन डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, प्रा. दत्ता खिलारे व डॉ. दत्ता डांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. 105 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने हे शिबिर यशस्वी झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी समाधान व्यक्त केले.