सोलापूर प्रतिनिधी विठ्ठल वाठारे
बाराव्या शतकात होऊन गेलेले बुरुड समाजाचे संत श्री बुरुड केतेश्वर महाराज यांची जयंती शनिवार दि.10 रोजी सकाळी सोलापूर महानगरपालिकेत सोलापूर शहर बुरुड समाजाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारत देशात फक्त सोलापूर महापालिकेतच संतश्रेष्ठ केतेश्वर महाराजांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी केली जाते.महापालिकेच्या कौन्सिल हॉलमधील संत केतेश्वरांच्या साडेपाचफुटी तैलचित्रास व आयुक्त कार्यालयातील प्रतिमेस सहाय्यक आयुक्त श्री.विक्रमजी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व आरती करण्यात आली,त्यावेळी संत केतेश्वरांचा जयघोष करण्यात आला, समाजाचे उपाध्यक्ष श्री.चंदन वडतिले यांनी पौरोहित्य केले.सर्वांना लाडवांचा प्रसाद वाटण्यात आला.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बुरुड समाजाचे अध्यक्ष,पत्रकार श्री. दशरथ वडतिले यांनी प्रास्ताविक भाषणात संत केतेश्वरांचा जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला व समाजाला पुढे नेण्यासाठी संतांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले.माजी अध्यक्ष श्री.रमेश शेंद्रे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.खजिनदार श्री.नितीन रोहिटे यांनी आभार मानले.समाजाचे कार्याध्यक्ष श्री.विठ्ठल साळुंके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास सर्वश्री पंडित वडतिले,अरुण साळुंके, ज्ञानेश्वर सुरवसे,रामचंद्र जतकर, नवनाथ सुरवसे, विष्णू साळुंके, लखन जतकर,बिरप्पा वडतिले योगेश वडतिले,शिवानंद वडतिले,मारुती साळुंके, देविदास कुकडे, आदित्य साळुंके, परमेश्वर वडतिले, श्रीनिवास सुरवसे, ऋतुजा वडतिले व रोहिणी वडतिले आदी समाजबांधव उपस्थित होते. तसेच महापालिकेतील मुख्य कार्यक्रमानंतर बुरुड समाजातील विविध संघटनांच्यावतीने पार्क चौक, विडी घरकुल, भवानी पेठ येथे संत बुरुड केतेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
समाज बांधवांनी रक्तदानात सहभाग नोंदवत महाप्रसादाचा लाभही भेटला.