सोलापूर प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवारी तपोरत्नं पादुकांची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.
मंगळवारी सकाळी ७.०० वाजता नेताजी संस्थेच्या अशोक चौकातील कार्यालयात 'श्री'च्या पादुकांची विठ्ठल कुंभार व सौ.रुपाली कुंभार या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत सहस्रबिल्वार्चन व महाभिषेक पूजन करण्यात आले.तदनंतर संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या नेतृत्वाखाली 'श्री ' च्या पादुकांची पालखी, पुरवंत ( केगांव),सनई चौघडा (गौडगांव), बँड पथकासह सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
मिरवणूक अशोक चौक-७०फूट-जुना कुंभारी नाका- आकाशवाणी केंद्र- निलम नगर मार्गे काढून नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे सांगता झाली.मिरवणुकीत राजराजेश्वरी प्राथमिक शाळेतील ३० विद्यार्थीनींनी शिरेवर मंगल कुंभकलश घेऊन सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत बसवराज लिगाडे व राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत साक्षी लोकम या नेताजी इंग्लिश मिडियम शाळेचे विद्यार्थी अश्वावर आरुढ झाले होते. बग्गीतील सजीव देखाव्यात शिवशंकर (सुजल चाबुकस्वार व लोकेश येमुल), पार्वती (समर्थनी मद्दानी) सरस्वती (श्रावणी शिरसिल्ला), वीरतपस्वी महास्वामीजी ( अनिरुद्ध चव्हाण), तपोरत्नं महास्वामीजी(अभिषेक डोंगराजे व वेदांत सुतार), बसवेश्वर महाराज (संकल्प हिरेमठ), अक्कमहादेवी (श्रद्धा बिराजदार), हेमरेड्डी मल्लम्मा (कुमारी पारे), विठ्ठल (श्रेअस गंगुल), रुक्मिणी (अंजली मैले),संत ज्ञानेश्वर (ऋषिकेश वन्नम), संत तुकाराम (रोहन नुती) या विविध वेशभूषेत नेताजी व राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे बालके आकर्षक दिसत होते.
मिरवणुकीत राजराजेश्वरी माध्यमिक शाळेचे लेझीम पथक, नेताजी महाविद्यालयचे लेझीम पथक, ढोल पथक, शिवतांडव नृत्य ,नेताजी प्राथमिक शाळचे हर हर शंभो शिव नृत्य या विविध पथकांनी ठिकठिकाणी आपली कला सादर केली. मिरवणुकीत नेताजी सुभाषचंद्र बोस बालक मंदिर प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम , माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राजराजेश्वरी प्राथमिक शाळेतील स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.मिरवणुकीत ठिकठिकाणी भक्तगण पादुकांचे दर्शन घेत होते. सदभक्तांच्या दर्शनासाठी पादुकां दिवसभर ठेवण्यात आल्या होत्या.भावीक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
या मिरवणुकीत माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, होटगीचे उत्तम पाटील, राजशेखर फताटे ,लिंबीचिंचोळीचे सिद्धेश्वर नरोळे, संस्थेचे लेखापरीक्षक महेश आळंगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर ,सुभाष धुमशेट्टी, लक्ष्मण यादव, बशीर बिजली संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार , प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व परिसरातील भक्तगण सहभागी झाले होते.