नाशिक प्रतिनिधी
अमळनेर येथे सुयोग महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या माहेरवाशीण स्नेह मेळ्यात येथील सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल देव यांना विशेष कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये धुळे येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या नेरकर यांच्या हस्ते तसेच डोंबिवलीच्या सामाजिक कार्यकर्त्या रजनी येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहल देव यांना गौरवण्यात आले.
याप्रसंगी रविंद्र मालपुरे, अजय कासोदेकर, जयश्री येवले, सरिता चितोडकर, विमलताई पिंगळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहल देव विविध सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असून त्या नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.