पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे नागरी सुविधांचा अभाव असून यासाठी जबाबदार पंढरपूर नगरपालिका सत्ताधारी व प्रशासन असून पंढरपूरवासी यांना नागरी सुविधा योग्य पद्धतीने तसेच सातत्य ठेवून दिले जात नाहीत आरोग्य सेवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छ करणे, व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य फेरीवाले इतर व्यवसायिक यांना कोणत्याच प्रकारचा आधार वाटावा असं कोणतेच काम नगरपालिकेकडून होत नाही यामधून सत्ताधिकारी व प्रशासनात समन्वय नसल्याचा दिसून येते.
अशा विविध कारणांमुळे व आमच्या कडे येणाऱ्या विविध प्रकारच्या तक्रारी मुळे आम्ही पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार आहोत तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पंढरपूर नगरवासी यांना व्यापाऱ्यांना येणाऱ्या भाविक भक्तांना योग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी आम आदमी पार्टी नगरपालिका निवडणूक लढविणार अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली
यावेळी पत्रकार परिषद मध्ये जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ भोसले तालुका संघटक श्रीरंग बागल तालुका अध्यक्ष काशीद साहेब जिल्हा युवा अध्यक्ष गगन गोडसे माढा तालुका अध्यक्ष सतीश लोंढे बंडू मोरे संभाजी गांडुळे दत्ता भोसले आदी आम आदमी पार्टीचे कार्य व कार्यकर्ते उपस्थित होते