भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री. यल्लमा देवीची यात्रा आजपासून सुरू झाली आहे.उद्या पालखी सोहळा मिरवणूक व होम पूजन करून यात्राची सांगता होणार आहे.
आज पहाटे श्री. उत्सव मूर्तीचा अभिषेक करून यात्रेस सुरुवात झाली आज दिवसभर गावातील मानकरी व पुजारी यांचा नैवद्य दाखवण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे.
गावात तीन ठिकाणी यात्रा भरवली जात आहे. यात्रेत येणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांची खास अशी सोय करण्यात आली आहे. या यात्रेत व्यापारी भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. आज संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
उद्या 21/12/2022 रोजी श्रीच्या पालखीची गावातून पुजारी व मानकरी यांच्या कडून वाजतगाजत मिरवणूक काढली जाणार आहे.
आजपासून सुरू असलेल्या श्री.यल्लामा देवीच्या यात्रेस व्यापारी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. तसेच यात्रा शांततेने पार पाडवी. असे आवाहन सरपंच राजकुमार पाटील यांनी केले आहे