जोगेशवरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
दिनांक - १३ डिसेंबर, मंगळवार रोजी कुणबी समाज कार्यालय, कोकण नगर, जोगेश्वरी - पुर्व येथे "उदय दिनदर्शिका २०२३" प्रकाशन सोहळा आणि समाज बांधव दिलीप गणपत राणिम सेवानिवृत्त कर्मचारी (बृहन्मुंबई महानगरपालिका) मनोहर महादेव काप (सामाजिक कार्यकर्ते) यांचा सत्कार सोहळा पार पाडण्यात आला.
यावेळी पदाधिकारी, समाजबांधव, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.