पंढरपूर प्रतिनिधी
जुना कासेगाव रोड जवळील भुवनेश्वरी मंदिराजवळ समर्थ नगर येथून शनिवार दि ३०डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास खिलार जातीची अंदाजे ६० ते७० हजार रुपये किंमतीची गाय चोरीला गेली. ज्योती कुलकर्णी यांची ही गाय असून सापडल्यास योग्य ते बक्षिस दिले जाईल. पंढरपूर शहरा नाजिक असणाऱ्या जुना कासेगाव रोड या परिसरात आता मागील १०वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिक प्लॉट खरेदी करून घरे,बंगले, फार्म हाऊस बांधत आहेत.
मोकळी हवेशीर परिसर असल्याने तसेच जागा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा ओढा वाढत आहे,पण लाईट आणि ईतर सोयी सुविधा नसल्याने अनेक भुरट्या चोऱ्या,वाटमारी असे गैरप्रकार वाढतं आहे.ग्रामीण विभाग पोलिसांची गस्त सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जाते पण तसे होताना दिसत नाही यामुळे रात्री अपरात्री या परिसरात राहणाऱ्या लोकांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे.काही महिन्यांपूर्वी याच कुलकर्णी कुटुंबीयांची म्हैस चोरीला गेली होती. आता परत जातिवंत देशी गाय चोरीला गेल्याने सदर कुटुंबीय निराश झाले आहे.
ही गाय कोणाला आढळल्यास 9890817314,7385070979,8329001108 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, योग्य माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल असे कुलकर्णी कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.